#Personal #Marathi
तीन वर्षांपूर्वी याच वेळी कार्यालयातून थकून भागून घरी येऊन घरच्या पाहुण्यांच्या चहापाणाची व्यवस्था पाहत होतो. लग्न मात्र अगदी साग्रसंगीत झालं. म्हणजे कसं… ते “साग्रसंगीत” म्हणवताना व्याही मंडळींकडून “थोडासा” त्रास झाला तरी लग्न व्यवस्थित झालं…मग छान…!
2015 चं अर्धं वर्षच मुळी लग्नाच्या तयारीत गेलं. निलिमा ताईचं लग्न म्हणजे एक जिवंत आठवण आहे. देवब्राम्हणापासून ते अगदी कार्यालयात सामान पोचवे पर्यंत सगळी कामं…त्यातही नवरीचा भाऊ म्हणजे सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र(अर्थात कामं सांगण्यासाठी)…! थोडक्यात जरा शाब्दिक सफर करूया 29 डिसेंबर 2015 ची…
26 डिसेंम्बर 2015 रोजी देवब्राम्हण. हळद लावण्यापासून ते चुडा भरणे व मुहूर्त पूजेपर्यंत अगदी उल्हासात. मामेभावंडं कधी माझ्या घरी येतात तर हाच तो मजेचा काळ. मला आठवतं… हल्दीस्नानाच्या वेळी माझा मुद्दाम हट्ट की हळदीची गाणी लावायची. त्यासाठी होम थिएटर विकत आणण्याची वेगळी करामत आणि दुसऱ्या दिवशी अंगणात सगळ्यांनी त्याच होम थिएटर वर “शांताबाई” (झिंगाट नव्हतं ना तेव्हा) लावून फेर धरून नाचण्याची आणखी गंमत…! हे सगळं आजी – आजोबा पाहत होते…आणि दुसऱ्या नातीचं लग्न पाहतोय याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
लग्नात घालण्याच्या पेहरावासाठी मी जरा जास्तच खर्ची घातलं. म्हणजे लग्न निलिमाचं आहे की माझं हेच कळायला जागा नाही…😁
सीमंतीपूजनाच्या रात्री फारसे सुखद अनुभव आले नाहीत. सरबराई करणं काय असतं ते मला त्या दिवशी कळलं. इथून पुढे कुणाची सरबराई करणार तर नाहीच….स्वतःच लग्न (कधी केलंच तर) कोर्ट मॅरेज करेन हे नक्की…!!
वरातीत फारसा नाचण्याचा माहोल नसला तरी उत्साह भरपुर होता. आवर्जून मंगलाष्टक म्हणून मला माझ्या अल्पशा संगीत शिक्षणाचा अल्पसा परिचय देणं स्वाभाविक…😀
लग्नात सर्वाधिक आकर्षण होतं ते रुखवताचं. रुखवतावर नवरीच्या सासरच्यांसाठी संदेश होता. तो आज ते पाळत असतीलच अशी माझी आशा आहे.
बिदाई मध्ये रुकु ताईच्या लग्नात काही रडू आलं नाही. पण निलिमा स्वतःहून बिलगून अश्रू ढाळत असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं…पुन्हा त्याचे प्रवाह वाहू लागले…!
असो…आज तीन वर्षे झाली. याचं फलित म्हणून “मामा” चा जप न सोडणारी भाची पण मिळाली. आता या लग्नाचं फलित सुखी आयुष्याच्या रूपाने निलिमा व निखीलराव दोघांनाही मिळो ही सदिच्छा….!!
Warm Regards,
Dnyanesh Make “The DPM”
0 Comments
Neha Kulkarni · 29 December 2018 at 4:37 pm
Sweet post
The DPM · 29 December 2018 at 5:55 pm
Thanks ..!!
Nagel ▪ Berlin · 30 December 2018 at 6:44 pm
great ! congratulation
The DPM · 30 December 2018 at 4:01 pm
Thanks a lot..!
@ सुप्रिया पडिलकर . · 13 January 2019 at 1:34 pm
Great 👌👍
Mandar Karbhajan (Mandy) · 16 January 2019 at 7:52 pm
We really enjoyed a lot…!
The DPM · 16 January 2019 at 2:35 pm
Yups…😃