“जग भारताचे खूप मोठे देणे लागतो… भारताने आपल्याला शून्याचा शोध लावून गणित शिकवलं, त्याशिवाय जगात कोणताच वैज्ञानिक शोध लागणं शक्य नव्हतं…”
— अलबर्ट आईन्स्टाईन, महान शास्त्रज्ञ
सर्वांना सादर नमस्कार आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….🇮🇳
७२ वर्षे झाली स्वतंत्र होऊन आणि आपलं लोकशाहीचं प्रजासत्ताक स्थापन होऊन 69 वर्षे…. काय केलं आपण इतक्या वर्षात…? आज महासत्ता बनण्याचे स्वप्न प्रत्यक्ष साकारण्याच्या मार्गात आहोत ना, ते याच काळातील अखंड परिश्रम आणि प्रचंड देशभक्तीच्या सामर्थ्यानेच…!
आजच्याच दिवशी भारताला आधिकारीक स्वरूपात संविधान लागू झाले. तेच हे संविधान ज्यात तुमच्या माझ्या स्वातंत्र्याला अनेक अधिकार आणि कायद्यांसह लिखित स्वरूपात उपलब्धता आहे. अनेकांना वाटतं भारताचा इतिहास केवळ सत्तर वर्षांचा आहे. सिंधू पासून वैदिक संस्कृतींपर्यंत, मौर्यांपासून ते मराठ्यांपर्यन्त सर्व साम्राज्यांचा, कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत आसेतुसिंधु भारतवर्षाचा गौरवशाली इतिहास आहे हा. हा इतिहासच सर्वात मोठी ग्वाही आहे भारताच्या महासत्ता बनण्याच्या वास्तवाची!
प्राचीन इतिहासातील अनेक शतके भारत जगातील सर्वाधिक आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत असा देश होता. ही संपदा कुना दुसऱ्या देशाला लुटून कमावलेली नव्हती, निसर्गाने या भूमीला दिलेलं वरदान आणि आपल्या लोकांची मेहनत एवढंच काय ते त्या मागचं रहस्य. सुमारे हजार वर्षे मुघल, अरब, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज सर्वांनी भारताला लुटलं. खास आभार इंग्रजांचे… 200 वर्षांपेक्षा जास्त काळ लावला तुम्ही भारताला भिकेला लावायला. इथल्या वैभवाची राख सोडून गेलात तुम्ही ७० वर्षांपूर्वी नाही का…? आज तुमच्या अर्थव्यवस्थेला झटक्यात मागं टाकायला सज्ज आहोत आम्ही… आता कसं वाटतंय…?
जगाच्या इतिहासात अनेक देश दुसऱ्यांवर आक्रमण करून महासत्ता बनले, नंतर आपसात लढले आणि मातीत मिळाले. दोन्ही महायुद्धं चांगली उदाहरणं आहेत याला.आजच्या घडीला अमेरिका आहे त्या जागी… चीन उंबरठ्यावर आणि भारत त्याच वाटेवर….पण भारताचं महासत्ता बनणं हे कुणावर आक्रमण करून किंवा लुटून नाहीये…ना भारत महासत्ता बनल्यावर सत्तेचा गैरवापर करेल. भारत नेहमीच दुसऱ्यांना सोबत घेऊन सर्वांचं हित जपणारा देश आहे…!!
शंका असेल ना की करोडो लोक गरिबीच्या विळख्यात असताना महासत्ता बनण्याच्या काय गप्पा लावल्यात म्हणून…? काय असावं लागतं महासत्ता बनायला…? भारताकडे जगातली चौथी सर्वात मोठी सेनेची फौज आहे. भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर जगात सर्वाधिक आहे. सध्या तो 7.5% च्या पार आहे पण 2019 संपेपावेतो 8 टक्क्यांच्या जादुई आकडा पार होईल. भारताची गरिबीरेषेखालील लोकसंख्या झपाट्याने वर येत आहे. 2012 मध्ये 22% भारतीय दारिद्र्यरेषेखाली होते, जे की आज केवळ 12% आहेत. भारतातील उद्योग क्षेत्रातील झपाट्याने होत असलेली वाढ लवकरच भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणेल यात शंका नाही. केवळ एवढं चालू राहिलं तरी यावर्षी इंग्लंड ला, 2022 पर्यंत जर्मनी ला, 2030 पर्यंत जपान ला आणि 2045 पर्यंत अमेरिकेला मागे टाकून आपण जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार….!!!
भारतातील लोकसंख्येचा स्फोट एक समस्या आहे मात्र मात्र लोकसंख्येचा वाढीचा दर प्रमाणात आहे आणि तो कमी होतोय. अंदाज आहेत की 2050 नंतर भारताची लोकसंख्या कमी व्हायला लागेल…! सध्याला भारताची 65% लोकसंख्या युवा आहे… जगातील सर्वात तरुण देश… म्हणजेच जोश आणि उमेदीला कमी नाही, केवळ ती आपण देशाच्या विकासाच्या दिशेने नेली तर आपणच देशाला महासत्ता बनवू….!!
आपली अर्थव्यवस्था अर्ध्याहून अधिक सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये आपण उद्योगात लक्षणीय वाढ केली आहे. ही वाढ सुरू राहिली तर बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. कृषी क्षेत्रात आपण आज जरी कृषी उत्पादन निर्यातीत आघाडीवर असलो, तरी चीन आणि रशियाचा आदर्श ठेवून आपण वेळीच कृषी क्षेत्रात मोठे सुधार केले पाहिजेत. त्याने भारताच्या अर्थव्यवस्थेचे तीनही स्तंभ मजबूत होतील आणि बेसुमार गती मिळेल.
इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण ज्या तेजीने झेपावत आहोत, लवकरच भारतातील रस्ते-महामार्गांचा आमूलाग्र कायापालट होणार हे नक्की! रेल्वेमध्ये सुद्धा अपेक्षित नसली तरी लक्षणीय प्रगती होतेच आहे. अनेक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर बांधले जात आहेत. एकंदरच चित्र झपाट्याने बदलत आहे.
लक्षणीय प्रगती म्हणावी तर ती आयटी क्षेत्रामध्ये. भारत जगातील सर्वात मोठा सॉफ्टवेअर निर्यातदार देश आहे. जगातील सर्वाधिक सॉफ्टवेअर इंजिनिअर पण आपल्याकडेच. खाली दिलेले गुरुग्राम व पुण्याच्या आयटी पार्क्सचे फोटो पाहता ही गोष्ट कळेलच…!
जागतिक राजकारणात अनेक विकसनशील देश भारताच्या साथीला आहेत. शिवाय रशिया आणि अमेरिका दोन्हीसोबत आपले सम्बन्ध चांगले होणं ही अतिशय मोलाची बाब आहे.
महासत्ता असणं म्हणजे केवळ बेसुमार पैसा आणि तगडी फौज नव्हे, तर सांस्कृतिक वारशाची श्रीमंती सुद्धा….! त्या हिशोबाने आपण आत्ताच महासत्ता आहोत.
वैदिक गणित-विज्ञान, आयुर्वेद, योग, अन्नपदार्थांची रेलचेल, ऐतिहासिक इमारती व मंदिरे… कशा कशाची कमी नाही. संस्कृत, मराठी, तामिळ, तेलगू, उर्दू, हिंदी व इतर अनेक भाषांमधली अजरामर साहित्यसंपदा इथपासून ते हॉलिवूड ला टक्कर देणारी तेलगू, तामिळ, मल्याळम, हिंदी, मराठी आणि बंगाली चित्रपटसृष्टी पर्यंत सगळ्या बाबतीत आपण चमकत आहोत आणि राहू…!
इतकी प्रचंड विविधता असतानासुद्धा देश म्हणून एकत्र राहणं कमालीचं अवघड आहे,मात्र आपल्यातील ‘आसेतुसिंधु’ हा रक्तातला गुण आहे. त्यामुळे आज युरोपियन युनियन आपसी मतभेदांच्या कचाट्यात सापडून विखुरण्याच्या मार्गावर असताना भारतीयांमधील एकात्मता वरचेवर बळकट होत आहे…!!
साभार,
ज्ञानेश माके “डीपीएम”
0 Comments
Nagel ▪ Berlin · 26 January 2019 at 7:08 am
a modern India 👍🌻
i was in Mumbai 💓
The DPM · 26 January 2019 at 7:54 am
Glad to know that….! I’d like to hear some good memories…🙂😊
@ सुप्रिया पडिलकर . · 12 April 2019 at 4:47 am
Wow… Apratim…. Writing Dear….!!
Good…!!!
The DPM · 19 April 2019 at 4:17 pm
धन्यवाद 🙏
Sanket Vijayarani Sanjay · 19 April 2019 at 2:01 pm
आपल्या राष्ट्राच्या प्रगतीविषयी आशावादी असणं ही निश्चितच स्पृहणीय बाब आहे. परंतु तरीही चालू वास्तवाचं ग्रे शेड्स मध्ये पृथक्करण करत राहणं अत्यंत गरजेचं आहे, असं मला वाटतं.
बाकी ब्लॉग मस्तच जमला आहे. 👌👍
The DPM · 19 April 2019 at 2:13 pm
वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. या ब्लॉग च्या इंग्रजी अनुवादामध्ये मी या ब्लॉग च्या या भागाच्या नावासमोर aspects and reasons असं लिहिलं आहे. अर्थात पुढच्या भागात या मार्गात काय अडथळे असणार याबाबद विश्लेषण असेल आणि ते खूप विस्तृत असणार आहे. याचा दुसरा भाग कारगिल विजय दिन 26 जुलै रोजी प्रकाशित होणार असून तिसरा आणि शेवटचा 15 ऑगस्ट रोजी येणार आहे. त्यात तुम्ही म्हणताय तसं “ग्रे शेड्स” मध्ये विश्लेषण असेल असा माझाही मानस आहे.
Sanket Vijayarani Sanjay · 19 April 2019 at 2:18 pm
Will read it for sure!