Marathi Podcast S1E6 – बेगडी नास्तिकता आणि विज्ञाननिष्ठ अध्यात्म Words Of DPM

अ सॉंग ऑफ आईस अँड फायर या कादंबरी मालिकेवर म्हणजेच नोव्हेल सिरीजवर असणाऱ्या या दोन अमेरिकन मालिका. 2011 ते 2019 असं सलग दहा वर्ष (2011 धरून दहाच) फस्ट वर्ल्ड ते थर्ड वर्ल्ड जवळजवळ अर्ध्या जगाच्या पॉप कल्चर मधला अविभाज्य घटक होऊन बसलेली गेम ऑफ थ्रोन्स मालिका आठव्या सिझन ला बेकार गंडली आणि तमाम ऑडियन्स चा भ्रमनिरास करून गेली. मूळ लेखक जॉर्ज आर आर मार्टिन यांनी पाचव्या खंडानंतर काही लिहिलंच नसण्याने जिओटी चा सहावा, सातवा व आठवा सिझन शोमेकर्स नि मनाने लिहून वाटोळं केलं. मध्यंतरी फायर अँड ब्लड हा प्रिकवल वाला खंड त्यांनी प्रकाशित केला व टार्ग्यारियन घराण्याच्या 300 वर्षांच्या सत्तेची कहाणी लिहिली. एचबीओ ने त्यावर आता नवी मालिका आणली हाऊस ऑफ द ड्रॅगन. तो नॉस्टॅल्जिक एक्सपिरियन्स ओरोजीनल क्वालिटी सह वापस आणल्याबद्दल आधी तर एचबीओ चे आभार. अद्याप तरी हाऊस ऑफ द ड्रॅगन चा पहिला सिझन बरा चाललाय. हा पॉडकास्ट रिलीज होईल तेव्हा कदाचित पहिला सिझन संपलेला असेल. या मालिकांमधून खरं पाहता बरच काही शिकण्यासारखं आहे.

जिओटीमध्ये एकसे बढकर एक अवलिया पात्र होते. त्यात शेवटपर्यंत लोकांना आवडलेलं एक पात्र म्हणजे टिरियन लॅनिस्टर. चलाख, धूर्त, मनाचा सच्चा, महिला मंडळात विशेष ख्याती, प्रेमात धोके खाल्लेला, छप्परफाड सेन्स ऑफ ह्युमर आणि बापाच्या उपेक्षेने ग्रासित शेवटी बापाचच जीव घेणारा हा टिरियन खूप जास्त रिलेटेबल आहे. त्याने कठीण प्रसंगात घेतलेल्या चॉइसेस या रियलिस्टिक होत्या. सहाव्या व सातव्या सिझन मध्ये त्याच्या कॅरेक्टर चा कचरा शोमेकर्स मुळे झाला पण एकूणच टिरियन लॅनिस्टर रराजकारणाच्या बाबतीत टायविनचा मुलगा शोभला. कुणाला कसं गुंडाळावं, शत्रूला मित्र कसं बनवावं, काड्या करणारांना कसं कात्रीत पकडावं, कठीण प्रसंगी जीवावर बेतल्यास सुटका कशी करावी, हाती आलेल्या कुठल्याही भूमिकेला उत्तमरीत्या कसं निभवावं, जालीम दुनियेशी तितकंच जालीम राहताना माणुसकी कशी जपावी हे टिरियन कडून शिकायलाच पाहिजे.

लोकांच्या पसंतीस उतरलेलं आणखी एक पात्र म्हणजे आर्या स्टार्क. या पोरीनं बाप एवढा लॉर्ड असताना, बालपण एवढं सुखात गेलेलं असताना उरलेलं बालपण अनेक भोग भोगले मात्र कुठेही नशिबाला दोष देत रडली नाही. नेहमी स्वतः स्वयंसिद्ध कसं राहायचं याचे प्रयत्न करत राहिली. एक लहान मुलगी आहोत हे विसरून तलवार चालवायला शिकली. आपल्या बापाच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या टायविन ची कप बेअरर होऊनही त्याहीवेळेला एवढ्या वयस्कर, मग्रूर व कपटी माणसाशी लीलया मैत्री केली व शेवटपर्यन्त ओळख लपवून ठेवली.  पुढे जादू शिकली, चपळपणे कुणाचा जीव कसा घ्यायचा तेही शिकली. रेड वेडिंग चा बदला कसलाही बोभाटा न करता घेतला व नाईट किंग ला मारल्यावरही राज्य, जहागिरी वगैरे क्लेम करत बसण्यापेक्षा तिनं स्वतःचं जहाज घेऊन दर्यावर्दी करायचं ठरवलं. आपल्याला काय हवं ते हक्कानं घ्यायचं, लढायचं, जिंकायचं आणि जिंकण्याच्या नशेत बुडून जाण्यापेक्षा पुढच्या प्रवासाला लागायचं ही गोष्ट आर्या स्टार्क कडून शिकावीच शिकावी.

गेम ऑफ थ्रोन्स मधील लोकांच्या पसंतीस अगदी निर्विवादपणे उतरलेलं कॅरेक्टर म्हणजे ब्रिएन ऑफ टार्थ. या बाईच्या नशिबी सुद्धा भरपूर दुःख आलं. पण कर्तव्य आणि वचनाला ही कधीच चुकली नाही. अफाट शौर्याच्या जोरावर हिने नेहमी लढाऊ बाणा बाळगला. सांसा ने नकार दिला तरीही कॅटलीन ला दिलेल्या वचनाला जागत तिने बोल्टन्स पासून सुरक्षित ठिकाणी आणत सांसा ला नाईट्स वॉच ला आणलं. तिथून पुढेही सांसाच्या सेवेत तिने लॉंग नाईट लढली. ब्रान स्टार्क च्या दरबारात नाईट म्हणून आल्यानंतर तिने जेमीचा इतिहास किंग्ज गार्डच्या डायरीत लिहून तिचं जेमीवर असणारं प्रेम साध्य केलं.

हाऊस ऑफ द ड्रॅगन मध्ये अद्याप तरी कुठलं कॅरेक्टर इतकं डेव्हलप झालं नाही. जिओटीच्या तुलनेत स्टोरी चांगलीच फास्ट पुढे सरकत असल्याने कॅरेक्टर डेव्हलपमेंट ला तितका वेळसुद्धा मिळत नाहीये. तरीही डेमन टार्ग्यारियन हे अत्यन्त इंटरेस्टिंग कॅरेक्टर वाटतं. याशिवाय रेनिरा तर कथेचा केंद्रबिंदू आहेच. ऍलिसंट हायटॉवर चं कॅरेक्टर मात्र चांगलंच डेव्हलप होतंय.  मी आठव्या एपिसोड नंतर हे लिहितोय त्यामुळे अद्याप एमंड टार्ग्यारियन लहान मुलगाच दिसतोय. तरीही आईप्रमाणेच क्रूर, आतल्या गाठीचा तो आहे. हिंमत व शौर्याची जोड असल्याने रेनिरा ला पुढे चालून तो चांगलाच जड जाणार आहे हे मात्र निश्चित.

दोन्ही सिरियलमध्ये सर्वात घाणेरडा व्हिलन म्हणावा तर जोफ्रि बराथीअन. कारण तो जिओटी मध्ये तर डोक्यात जात होताच, हल्ली तिसऱ्या सिझन ची एक क्लिप फिरतीये ज्यात त्याने मार्जरी ला रेनिरा टार्ग्यारियन चा इतिहास सांगत असताना हाऊस ऑफ द ड्रॅगन चा सुद्धा पुरावा देऊन ठेवलाय. च्यायला एवढा डेंजर व्हिलन कसा काय असू शकतो बॉ कुणी!

असो, महाभारतातील गुंतागुंत, राजकारण, भाऊबंदकी हे सर्व जिओटी व एचओटीडी दोन्हीमध्ये बघायला मिळतं. शिवाय त्यातल्या बऱ्याच घटना इतिहासातील कुठल्या न कुठल्या सत्य घटनेवरून प्रेरित आहेतच. आठवा सिझन सोडता जिओटी कल्ट क्लासिक आहेच, मात्र एचओटीडी त्याहून बेस्ट व्हावी ही लॉर्ड ऑफ द लाईट चरणी प्रार्थना!

Valar Morghulis

Lord DPM of the House Kulkarni


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *