आताशा सुचत नाही काही
आताशा सुचत नाही काही
कवितांविना रिकामी राहून जाते वही
कल्पनेला शब्दमूर्त भाव येण्यासाठी
मनाच्या वाळवंटात गाव येण्यासाठी
कथा एखादी मनातल्या मनात दडून राही
कवितांविना रिकामी राहून जाते वही
तडफ, आग अन् प्रेमातील तमाम साऱ्या गोष्टी
लिहिण्यासाठी जगाव्या लागतात जळी पाषाणी काष्ठी
मन सोबतीचा असा काही शोध घेत नाही
कवितांविना रिकामी राहून जाते वही
कोरडे पडले कालच्या आठवांचे तळे
ज्यात कधी काळी कलेचा आविष्कार मिळे
स्वतःहून अन् नदी आता यावी या प्रवाही
कवितांविना कुठवर राहील रिकामी माझी वही!
– The DPM
0 Comments