लातूर, नाश्ता संस्कृती आणि दाक्षिणात्य पदार्थांचा प्रभाव

“लातूर मधी हाव व्हय, चल की नाश्त्याला! कस्लाईस बे लातूर मधी राहून आणखी कृष्णा वर इडली खाय नाहीस का? ही लातुराय पिल्लू…इथल्या साऊथ इंडियन ला प्रत्यक्ष साऊथ इंडियात चॅलेंज नाही भावड्या!”

ही माझा मित्र व्यंकटेश ची नाश्त्याला बोलावण्याची पद्धत. असं नाही बरं का की केवळ व्यंकटेश लातूरच्या साऊथ इंडियन बद्दल इतकं मीठ मसाला लावून सांगतोय, हे प्रत्येक लातूरकराचं ठाम मत आहे. 2013 ते 2016 आणि 2019 पासून आजपर्यंत लातुरात माझी साडेचार-पाच वर्षे गेलीत. आजवर लातूरकरांचं हे लातूरच्या दाक्षिणात्य पदार्थांवरचं अमर्याद प्रेम मला समजलेलं नाही. नाही, एक गोष्ट स्पष्टच सांगतो, मी स्वतः दक्षिणेत हैद्राबाद, विजयवाडा, नेल्लोर, तिरुपती, चेन्नई, वारंगल, बंगळुरू, बिदर इत्यादी शहरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन साऊथ इंडियन खाल्लेलं आहे आणि तरीही हे माझं ठाम मत आहे की लातूरच्या साऊथ इंडियन ला प्रत्यक्ष साऊथ इंडियात सुद्धा चॅलेंज नाही! लातूरच्या एकूणच नाश्ता संस्कृतीचा, आणि त्यात प्रामुख्याने असणाऱ्या दाक्षिणात्य पदार्थांचा आता सखोल आढावा घेऊया.

लातूरच्या साऊथ इंडियन फूड चं वेगळेपण

असं काय वेगळं असतं लातूरच्या साऊथ इंडियन मध्ये? तर बेसिक इडली डोसा सगळीकडे असतं तसच परंतु सर्व्हिंग मध्ये फरक आहे. मूळ दाक्षिणात्य इडली सोबत तुम्हाला ओल्या खोबऱ्याची चटणी मिळेल मात्र लातुरात तीच चटणी अस्सल मराठी चवीची होऊन जाते, म्हणजे शेंगदाण्याची. पण ही चटणी भाकरी सोबत खातो तशी नसते, अशी चटणी केवळ लातुरातच मिळते. या व्यतिरिक्त इथल्या सांभार आणि इडली डोसा बनवण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा एक वेगळंच रसायन आहे.

लातूर हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचा जिल्हा असल्यामुळे लातूर शहरात मोठ्या प्रमाणावर मूळचे कर्नाटकी असणारे लिंगायत व वीरशैव समाजाचे लोक पूर्वीपासून राहतात. हा समाज अनेक पिढ्यांपासून मराठी व कर्नाटकी चवींचं मिश्रण त्यांच्या आहारामध्ये घेत आलाय. त्यामुळे यातले बरेच लोक लातुरात दाक्षिणात्य पदार्थ त्यांच्या खास शैलीत बनवून लातूरकरांच्या मनात घर करतात. लातूरच्या चवीतला मराठवाडी ठसका आणि कर्नाटकी आंबूसपणा याचा एक सुरेख संगम होऊन इथले दाक्षिणात्य पदार्थ झकास बनतात. या व्यतिरिक्त लातूरमध्ये पोहे, निलंगा राईस आणि उपमा फ्राय हे नॉन साऊथ इंडियन फूड सुद्धा अत्यंत जबरदस्त मिळतात.

चला तर मग, लातूरच्या काही सुप्रसिद्ध साऊथ इंडियन रेस्टोरंट्स ची शाब्दिक सैर करूया.

शिदोरे इडली गृह

औसा रोडवर नंदी स्टॉप पासून अष्टविनायक मंदिराच्या दिशेने थोडसं आत शिरताच आत साधारण 200 मीटर अंतरावर आहे अप्पा शिदोरे यांचं जुनं-जाणतं शिदोरे इडली गृह. आसपास ट्युशन्स, हॉस्टेल्स आणि पीजी रूम्स ची भाऊगर्दी असल्याने “शिदोरे” मध्ये पीक अवर्स वर प्रचंड वेटिंग वगैरे असते; तरीही एक गोष्ट जी इथं कितीही गर्दीत असाल तरी लगेच मिळते आणि जी लातुरात यांच्याइतकं चांगलं कुणीही बनवत नाही, ते म्हणजे पोहे. कांद्यापोह्यांवर मघाशी उल्लेख केला ती शेंगदाण्याची ओली चटणी (सफेद व तांबडी दोन्ही प्रकारची) ओतून जेव्हा हे पोहे तुमच्या समोर येतात तेव्हा कधी संपतात हे तुम्हालाही कळणार नाही. याव्यतिरिक्त शिदोरे मध्ये मला विशेष आवडतं ते म्हणजे मसाला डोसा आणि चीज उत्तप्पा. चटणी वरती उल्लेख केला त्याच प्रकारची असली तरीही यांच्या चटणीला एक मिठास छटा आहे. शिवाय अँबियन्स चं म्हणाल तर नुकतंच रिनोव्हेट केलेलं हॉटेल आणि नेहमी श्रवणीय अश्या गाण्यांची प्लेलिस्ट असल्याने वातावरण चांगलंच “हॅपनिंग” असतं. शक्यतो कॉलेजचे तरुण मुलं-मुली शिदोरेवरच हँग आउट करणं पसंत करतात. पोहे आणि डोसा याव्यतिरिक्त अत्यंत चविष्ट अशी लस्सीदेखील येथे मिळते. यांची लातुरातच अंबाजोगाई रोड ला आणखी एक शाखा आहे. शिदोरे इडली गृह ला मिळतायत दहापैकी साडे आठ मार्क्स. (8.5/10)

कृष्णा इडली गृह

लातूरचा अभिमान असणारं गंजगोलाई मार्केट आणि त्यातल्या 64 गल्ल्यांच्या भूल-भुलैया मध्ये आहे कृष्णा इडली गृह. एक प्लेट इडली मध्ये किती वेळा चटणी घ्यायची याचे सर्व रेकॉर्ड तुम्ही कृष्णावरच मोडाल. लातूरमधील सर्वात चविष्ट इडली, सर्वात चविष्ट सांभार आणि सर्वात चविष्ट चटणी या सर्वांचा बहुमान कृष्णा इडली गृह ला जातोय. इडली व्यतिरिक्त इथे वडा सांभार देखील अत्यन्त सुरेख मिळतं. कृष्णा इडली ला मिळतायत दहापैकी नऊ मार्क्स! (9/10)

तुळजाई इडली गृह

 लातूरच्या प्रमुख साऊथ इंडियन रेस्टोरंट्स मध्ये तुळजाई अगदी नकळत व अत्यंत झपाट्याने प्रसिद्ध झालं. एके काळी दयानंद कॉलेज जवळ एक छोटंसं रेस्टॉरंट बघता बघता प्राईम लोकेशन वर तीन-तीन शाखांपर्यंत कधी पोचलं कळलंच नाही, आणि कारणंही तशीच आहेत. सांभार-चटणी तर अर्थात अत्यन्त जबरदस्त मिळतातच, शिवाय इथल्या इडली ला जी खास चव आहे ती अतुल्य आहे. इथली इडली जिभेवर अक्षरशः विरघळते इतकी मऊसूत आणि चविष्ट. इथे इतर पदार्थांमध्ये साबुदाण्याची खिचडी, उपमा आणि डोसा सुद्धा छान मिळतं. “तुळजाई” च्या एकूण तीन शाखा आहेत. एक दयानंद कॉलेज जवळ खाडगाव रोड ला, एक अंबाजोगाई रोड ला “रिलायन्स लातूर पॅटर्न” समोर आणि एक जुन्या रेल्वेलाईन वरील रस्त्यावर विश्व ट्रॅव्हल्स च्या ऑफिस च्या बाजूस. सदैव गर्दी असून देखील वेळेत ऑर्डर मिळते हे वैशिष्ट्य. तुळजाई ला मिळतायत दहापैकी आठ गुण! (8/10)

सुर्या/सुर्या दक्षिण इडली गृह

लातूरमधील सर्वात जास्त सुप्रसिद्ध आणि नावाजलेलं असं कुठलं साऊथ इंडियन रेस्टॉरंट असेल तर ते म्हणजे सुर्या. इडली, दोसा, कट दोसा, उपमा फ्राय, साबुदाणा खिचडी सगळंच इतकं चविष्ट मिळतं इथे की नाश्ताच काय, दुपारचं जेवणही भागून जाईल इतकं खाल. तरीही स्पेशालिटी मध्ये उपमा फ्राय आणि कट दोसा सर्वात चविष्ट म्हणावं. झोमॅटो वर टॉपच्या रेस्टोरंट्स मध्ये असण्यापासून ते एक किलोमीटर पेक्षाही कमी अंतरात दोन कायम गर्दीच्या शाखा असेपर्यंत ‘सूर्या’चा दबदबा गेल्या सात-आठ वर्षांपासून कायम आहे. सुर्या च्या एकूण तीन शाखा आहेत. गंजगोलाई मध्ये सुर्या, औसा रोड वर खर्डेकर स्टॉप ला सुर्या दक्षिण 2.0 आणि औसा रोडवरच आदर्श गेटच्या जवळ सुर्या दक्षिण. सुर्या इडली गृह ला मिळत आहेत दहापैकी साडेनऊ स्टार (9.5/10).

अभिमान आमच्या इडली-चटणीचा

प्रत्येक शहराचं स्वतःचं फूड कल्चर असतं आणि हल्ली त्यावरून बऱ्यापैकी स्टीरिओटाइपिंग सुद्धा होतं. आमच्या फूड कल्चर मध्ये इडली इतकी प्रीडॉमीनंट आहे याचा आम्हा लातूरकरांस प्रचंड अभिमान आहे. बाहेरचं खाल्लं तरी पोटात भरमसाठ मैदा आणि अजिनोमोटो तरी जाऊ देत नाहीत आम्ही. त्यामुळे गेल्या वीस एक वर्षात बाहेरचं खाणं समाजात इतकं वाढलेलं असताना आमचं साऊथ इंडियन वरचं प्रेम म्हणजे खरं तर सेव्हिंग ग्रेस. पुण्याकडे बाकरवडी आणि मिसळ असेल, मुंबईकडे वडापाव आणि पावभाजी असेल तर आम्हालाही लातुरी इडली चटणीचा जाज्वल्य अभिमान आहेच.

काही सन्माननीय उल्लेख

 या व्यतिरिक्त औसा रोडवरच आप्पा इडली गृह, अंबाजोगाई रोड वर गुरुकृपा इडली गृह, खाडगाव रोड वर अक्षय इडली गृह, गोलाईतील सुर्या रीट्रीट ही सगळी सुद्धा काही चांगली साऊथ इंडियन रेस्टोरंट्स आहेत. एकंदरच लातुरात अनेक ठिकाणी कमीअधिक फरकामध्ये नाश्त्याचे पदार्थ छान मिळतात आणि त्यामुळेच कधी लातूरला आलात आणि तुमच्या लातूरकर मित्राने “नाश्त्याला येउललास का” म्हंटल्यावर अजिबात आढेवेढे न घेता “हां येउललाव की” म्हणायचं आणि अस्सल लातुरी चवीचा आस्वाद घ्यायचा.

Warm Regards,

Dnyanesh Make “The DPM”

Post Script and Disclaimer

All of the above photos have personally been captured by the author and the everything written in the blog is personally experienced by the author. None of the restaurants mentioned above, have in any way, sponsored us, neither any monetary or non monetary benefit has been derived for this blog.


20 Comments

Vyankatesh Gomchale · 16 February 2021 at 10:49 am

This is not one of the best this is the best food blog I have ever read!

  The DPM · 16 February 2021 at 12:47 pm

  Thanks Vyankatesh

Harsh · 16 February 2021 at 11:06 am

Awesome👌🏻😋

  The DPM · 16 February 2021 at 12:24 pm

  Thanks Harsh!

Dhiraj kasar · 16 February 2021 at 12:16 pm

Khup bhari ahe sir 😍😍

  The DPM · 16 February 2021 at 12:25 pm

  Thanks Dhiraj

Srinivas Waghmode · 16 February 2021 at 12:56 pm

100% true blog❤️🤘🏻

  The DPM · 16 February 2021 at 1:52 pm

  Thanks for the read Mr Srinivas

Shardul Pedgaonkar · 16 February 2021 at 1:46 pm

Very well written👍🏼 Eager to taste all of these💫

  The DPM · 16 February 2021 at 1:52 pm

  Thanks Shardul!

  Mohit Deshmukh · 16 February 2021 at 4:02 pm

  Awesome

Niranjan pratap kand · 16 February 2021 at 3:52 pm

वाचून तर तोंडाला पाणी सुटून राहीलन बे.😋😜
Vankie दादा आमचं ठरलं आम्ही पण येतोय लातूरला कृष्णा ची इडली खायला

  The DPM · 16 February 2021 at 4:27 pm

  Thank you Mr. Niranjan

Mohit Deshmukh · 16 February 2021 at 4:03 pm

Awesome

  The DPM · 16 February 2021 at 4:27 pm

  Thank you Mohit!

Vaishali Phatate · 17 February 2021 at 6:29 am

Gr8 information and good written….keep it up Dnyesh.. photo’s also tempting….will come thr now…

  The DPM · 17 February 2021 at 7:03 am

  Thank you Mrs. Vaishali Aunty. Will be glad to have you in Latur!

Shubham Vyas · 1 March 2021 at 7:20 pm

Latur he idali dosyache maher ghar aslya sarkh vatat ahe re….Agadi South Indian style mdhe info.dili

  The DPM · 2 March 2021 at 4:58 am

  धन्यवाद भाऊ…असेच आपले पाठबळ असू द्या!

Tanuja joshi · 12 January 2022 at 5:37 am

Bharich!! Very well written

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *